धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

तालुका प्रतिनिधि/मनोज वाघमारे

नांदेड :- राजुरा बू. येथे . 68 व्या धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. आमचे आदर्श शिक्षक जाधव सर आणि दत्ता गुरुजी पोटफोडे यांच्या हस्ते ध्जारोहण व पूजन करण्यात आले. धम्म चक्र परिवर्तन दिनाचे माहितीचे ओळी.

इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात "अशोक विजयादशमी" म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. ती धम्मभूमी सध्या दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते.

आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले.धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि/किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. 

महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. तथापि, या सणाला "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही म्हणले जाते.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने