माहूर तालुक्यातील साकुर येथील कु. सपना किसन बरगे यांची वनरक्षक पदी निवड.


नांदेड :- किनवट-माहूर तालुका आदिवासी बहुल जाणल्या जाणारा तालुका असून सुद्धा येथील गरिबी वर मात करून स्वताच अस्तित्व निर्माण करणारी साकुर गावातील पहिली आदिवासी मुलगी कु.सपना इंदुबाई किसन बरगे हिने परिवारासह गावचे नाव लोकित केले आहे.

कु. सपना रा. साकुर ता. माहुर जिल्हा नांदेड येथील रहिवासी असुन साकुर हे गाव पेसा क्षेत्रात असल्यामुळे पेसा भरती साठी विशेष प्राधान्या असुन तिच्या यशाला पाठबळ मिळाले आहे. वनरक्षक अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. देवगिरी कल्याण आश्रम चे अधिकारी श्री. अर्जुन प्रसराम लांबाटे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने सपना व तिच्या परिवाराने कल्याण आश्रम चे आभार मानले आहे. आज समाजामध्ये अशा होतकरू मुलींची प्रेरणा घेऊन इतर मुलीने पण आत्मनिर्भरते कडे एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.

 व आपलं अस्तित्व स्वतःचा बळावर व स्वतःचा पायावर निर्माण करण्याची ताकद व जिद्द निर्माण केली पाहिजे.तसेच सपना किसन बरगे हिने गावाचे नाव रोशन केल्याने गावकरी व नातेवाईकां कडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने