प्रतिनिधी/सुनील राठोड
माहूर : ज्योतिबा खराटे यांचेवर सतत पक्षाने अन्याय केल्याने किनवट माहूर शिवसेना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सोमवार दि.२१/१०/२०२४ रोजी अंजनखेड येथे सकाळी ९ वा. बैठक होऊन शिवसेना उ.बा.ठा. च्या माध्यमातून निवडणूक लढवाची किंवा नाही याबाबत सर्वांनी साधक बाधक चर्चा होऊन अंतिम निर्णय शिवसेना किनवट माहूर विधानसभा प्रमुख तथा लोकनेते ज्योतीबादादा खराटे यांनी घ्यावा असे किनवट माहूर येथील शिवसैनिकांनी ठरविले आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा लोकनेते ज्योतीबादादा खराटे, उपजिल्हा प्रमुख अनिल रूणवाल, सभापती नामदेव कातले, किनवट तालुका प्रमुख मारोती दिवसे पाटील, माहूर तालुका प्रमुख उमेश जाधव, युवासेना जिल्हा प्रमुख यश खराटे, युवासेना जिल्हा समन्वयक नितीन पाटील कन्नमवार, किनवट शहर प्रमुख प्रशांत कोरडे, माहूर शहर प्रमुख निरधारी जाधव, युवासेना उप जिल्हा प्रमुख जितु चोलो, रक्तदान शिबाराचे महासंयोजक अभिषेक जयस्वाल, उदय नाईक, बंडु दळवे, किनवट युवासेना किनवट तालुका प्रमुख अतुल दर्शनवाड, युवासेना माहूर तालुका प्रमुख अक्षय वाघ पाटील, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख गजानन चव्हाण, पवन गवळी, सर्कल प्रमुख बजरंग वाडगुरे इत्यादी बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा