अर्धापूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष पथसंचलन.


नांदेड :- आज दि .१२ ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त अर्धापूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष पथसंचलन संपन्न झाले गावातील हनुमान मंदिर येथून संचलन सुरु होऊन शहरातील मुख्य मार्गावरून चालत जाऊन महादेव मंदिर येथे विजयादशमी उत्सव संपन्न झाला .या संचलनात तालुक्यातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने गणवेशात सहभागी झाले , संचलनाच्या मार्गावर नागरिकांनी फुल टाकून स्वागत केले .

या उत्सवास प्रा. डॉ. श्री नागेशजी कल्याणकर हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते मार्गदर्शन करतानी संघ का शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे , संघाने गेल्या ९९ वर्षात समाजात व्यक्ति निर्माणाच्या माध्यमातून हिंदू समाजामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे कार्य केले आहे . शताब्दी वर्षानिमित स्वयंसेवकांनी समाजाला सोबत घेऊन कुटुंबप्रबोधन , समरसता , पर्यावरण , नागरी शिष्टाचार , स्व आधारित जीवन पद्धती या विषयात मोठ्या प्रमाणात काम करावे .देशाच्या व समाजाच्या कामासाठी समाजाने संघटित झाले पाहिजे असे आवाहन केले .



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने