किनवट :- दिनांक19/09/2024 गुरुवार रोजी वनोपज शेतकरी उत्पादक कंपनी लि. किनवट यांची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्ष म्हणून तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे साहेब व उपाध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार विकास राठोड साहेब उपस्थित होते. तसेच सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ (क्लस्टर आधारित व्यवसाय व्यवस्थापन) यांच्या वतीने श्री शुभम शिरतुरे सर उपस्थित होते. सभेमध्ये तालुका कृषी अधिकारी यांनी उपस्थित सभासदांना नवीन सरकार योजना आणि शेती लागवड विषयी मार्गदर्शन केले तसेच नायब तहसीलदार विकास राठोड सर यांनी सभासदांना शेतकरी उत्पादक संघटना याचे महत्त्व पटवून दिले आणि शुभम शिरतुरे सर यांनी नेमकं शेतकरी उत्पादक कंपनी याची मेन उद्दिष्टे आणि क्लस्टर आधारित व्यवसाय व्यवस्थापन यात कोणत्या रित्या मार्गदर्शन करू शकते आणि कशाप्रकारे शेतकरी उत्पादक कंपनीला यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करू शकते याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
तसेच कंपनीचे सचिव दिगंबर मुंडे सर यांनी प्रस्तावना सादर करून कार्यक्रमास सुरुवात केली आणि उपस्थित सभासद शेतकरी बांधव यांना कंपनीचा सखोल आढावा दिला आणि भविष्यातील उपाययोजना याबद्दल माहिती दिली तसेच संचालक हनुमंत काळे सर यांनी सभासदांसमोर आर्थिक अहवाल सादरीकरण केले आणि कंपनीचा नफा तोटा याबद्दल माहिती दिली व तसेच कंपनीच्या अकाउंटंट निलाक्षी पदमवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशस्वीरित्या पार पाडले आणि कार्यक्रमाच्या शेवट सर्व उपस्थित शेतकरी सभासद बांधवांना उत्तम भोजनाचा लाभ देण्यात आला.अशाप्रकारे वनोपज शेतकरी उत्पादक कंपनी यांची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या पार पडली.
टिप्पणी पोस्ट करा