दहेली नगरीची भूमिकन्या कु. पुनम भुमाजी गुरनुले नांदेड पोलीस दलात निवड झाल्याबद्दल जय श्रीराम गणेश मंडळ दहेली तर्फे सत्कार करण्यात आला.


किनवट :- दहेली नगरीची भुमिकन्या कु.पुनम भुमाजी गुरूनुले नांदेड पोलिस दलात निवड झाल्याबद्दल जय श्रीराम गणेश मंडळ जय श्री राम नगर दहेली व महिला मंडळ तर्फे स्वागत करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष भोजना नामसनवार, उपाध्यक्ष सौरभ जयस्वाल, सचिव ऋषिकेश एंगंटवार, सदस्य सुमित जयस्वाल, प्रणित कचकलवार, रमेश शैलेंद्रवार, किशोर वाघमारे, शुभम जयस्वाल, विजय आदे, व सर्व सदस्य व महिला मंडळ उपस्थित होते.

आज पूनम ताई ची प्रेरणा समाजातील प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी घ्यायला हवे
आजच्या काळातील महिला व मुली ग्रहणी न होता दुर्गा व झाशीची राणी लक्ष्मीबाई व सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन सशस्त्र क्रांती घडवून आणण्याची गरज आजच्या समाजाला आहे.
आज शिक्षण क्षेत्रात मुलांपेक्षा जास्त मुलींची उंच भरारी व चिकाटी दिसायला मिळत आहे त्यांचे चिकाटीचे फळ म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात मुली भाग घेऊन यशस्वी होत आहे व त्यांचा प्रभाव पाहायला मिळत आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने