विदर्भ :- मराठवाड्यातील बहुचर्चित निम्न पैनगंगा धरण प्रकल्प (चिमटा धरण) प्रकरणी बुडीत क्षेत्रातील मौ. पाथरी (गावठाण/शेतजमीन) व मौजे टेंभी तांडा ता. किनवट जिल्हा नांदेड येथील स. न. 7/ई, 7/ड, 7/क, 7/अ व 7/क, एकूण क्षेत्र 5.52 हे. आर. जमिनीचे भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्यासाठी व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार अनुसूचित क्षेत्रातील जमीन संपादित करण्यासाठी सबब ग्रामपंचायत पाथरी येथे दिनांक 17/02/2026 रोजी विशेष ग्रामसभा आयोजीत करण्यात आली आहे. जमीन संपादन करण्यास ग्रामसभेची संमती असल्याबाबत विषय समाविष्ट करून ग्रामसभेचा ठराव द्यावे असे परिपत्रक सहायक जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी किनवट यांच्यातर्फे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. त्या अनुषंगाने या प्रकल्पामुळे या भागातील नागरिकांचे किती नुकसान आहे, या विनाशकारी प्रकल्पाऐवजी उच्च पातळीचे बंधारे किती सोयीचे आहे याचे महत्त्व आज पाथरी येथील नागरिकांना पटवून देण्यात आले व उद्याच्या होणाऱ्या ग्रामसभेत या चिमटा धरण प्रकल्पाच्या विरोधात ठराव द्यावे यासंदर्भात निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने नागरिकांना मार्गदर्शन करण्यात. यावेळी धरण विरोधी संघर्ष समितीचे भगवती नाईक, श्रीनिवास उईके, संदीप (बंटी) जोमदे, अनिल टेकाम, राहुल सोयाम व इतर गावकरी उपस्थित होते.
मराठवाड्यातील बहुचर्चित निम्न पैनगंगा धरण प्रकल्प (चिमटा धरण)...
V24news.live
0
टिप्पणी पोस्ट करा