माहूर :-किनवट-माहूर विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे काल नवनियुक्ती कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच माहुर तालुका अध्यक्षपदी सागरभाऊ महामुने तर युवा मोर्चा अध्यक्षपदी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते अविनाश भाऊ शंकरराव भोयर यांची तालुका अध्यक्ष पदी काल निवड करण्यात आली असून पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवून मला भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती दिली त्याबद्दल मी तुमचा विश्वासच पात्र आहे. आणि सदैव पक्ष वाढीसाठी व राष्ट्रहीतासाठी तत्पर राहील.
असे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अविनाश शंकरराव भोयर यांनी सांगितले तसेच काल नियुक्ती होताच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष,शोशल मीडिया रूपी शुभेच्छाचा वर्षाव झाला होता. त्याबद्दल अविनाश शंकरराव भोयर यांनी आपल्या सर्व मित्र परिवार व सर्व शुभेच्छुकांचा आभार व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा