हळद :- कोरोनानंतर हळदीला जगभरात मोठे महत्व श्चिमात्य राज्यात रोग प्रतिकार शक्ती वाढविणारा (इम्युनिटी बुस्टर) घटक म्हणून हळदीच्या गोळ्या विकल्या जात आहेत. स्टारबक्स सारख्या आंतरराष्ट्रीय चैन असलेल्या कॅफेमध्ये ‘गोल्डन टर्मरिक ल्याटे’ या नावाने हळदीचे दूध महागड्या दराने विकले जात आहे. युरोपात अल्झायमर व पार्किन्सन आदी आजारांच्या औषधामध्ये हळदीपासून निर्माण होण्याऱ्या तेलाचा वापर करण्यात येत आहे.
हळदीचा वापर दैनंदिन जीवनापासून ते औषध निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे हळदीला देश आणि जगभरातून मोठी मागणी आहे. या पिकास किड कमी प्रमाणात लागते पाण्याचा वापर कमी प्रमाणात होते. देशभरात ५० लाख टन हळदीचा वापर होतो त्यापैकी निम्मी हळद महाराष्ट्रात उत्पादित होते.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे देशातील पहिले हळद संशोधन केंद्र होत आहे. देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करणार आहे. या केंद्रासाठी 800 कोटी रुपयांचा निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा