नांदेड : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने , आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता मा. विलास कुमरवार राज्याध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद नांदेड यांचे दालनासमोर आंदोलन सुरू झाले. दुपारी 2.00 वाजता, आंदोलकर्ते मा. मु. का अ. जिल्हा परिषद नांदेड, यांचे कॅबिन समोर वरांड्यामध्ये , व सर्व कर्मचारी उप मु . का. अ. जिल्हा परिषद नांदेड यांचे कॉबिन समोर जवळपास 500 ते 600 कर्मचारी बसले, त्यामुळे काही काळ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना बाहेर निघता आले नाही, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे खालील प्रमाणे मागण्या संदर्भात ठोस भूमिका घेऊन लेखी पत्र देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेत नसल्याची भूमिका घेतली... त्यांनतर उप मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली , वेतनातील फरक , राहणीमान भत्ता , भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा, कोरोना भत्ता, सेवा पुस्तिकातील सर्व नोंदी , रजेच्या नोंदी, 10 टक्के भरतीतील अनियमितता इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली, लेखीपत्र दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन यशस्वी होण्यासाठी सहकार्य केल्याबाबत सर्व कर्मचारी पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले, त्याप्रसंगी सर्व जिल्हा कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, सर्व कार्मचारी उपस्थित होते...,
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या दालना समोर आंदोलन.
ज्ञानेश्वर गुरनुले ( 9764677413) संपादक
0
टिप्पणी पोस्ट करा