महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे ठिय्या आदोलनाचे आव्हान. ता.अध्यक्ष संजिव वानखेडे

किनवट : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अन दान, ग्रामपंचायतचा हिस्सा, राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी रक्कम, कोरोना अंतर्गत प्रोत्साहन भत्ता, अपघात विमा काढण्यास ग्रामपंचायती टाळाटाळ करीत असल्याने सोमवार दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेनेच्या वतीने राज्याध्यक्ष विलास कुमरवार, सरचिटणीस दयानंद येरंडे व नांदेडचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पठाण यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. दि. १६ ऑगस्ट रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त
कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजीव वानखेडे यांनी केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १) ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना उद्योग उर्जा व कामगार विभाग अधिसुचना दिनांक १० ऑगष्ट २०२० नुसार सुधारीत किमान वेतन मंजूर झाले असुन, ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक व्हीपीएन २०२०/ प्रक्र २०९/परा- ३ दिनांक २२.६.२०२२ नुसार १ एप्रिल २०२२ पासुन आदेश निर्गमित झालेले आहे. सुधारीत दरानुसार वेतन अनुदान ५०%, ७५%, १००% अनुदान ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. परंतु शासन अनुदानाव्यतीरीक्त ग्राम पंचायतीच्या, हिश्याची वेतनापोटी देय असलेली उर्वरीत २५%, ५०% रक्कम देण्यास बऱ्याच ग्राम पंचायती टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचे आर्थिकनुकसान झालेले आहे. २) राहणीमान भत्याची रक्कम, बऱ्याच ग्रामपंचायती जाणीवपूर्वक देत नाहीत, अशा ग्राम पंचायतीवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. ३) भविष्य निर्वाह निधिची रक्कम देण्यास बऱ्याच ग्राम पंचायती टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे आर्थीक नुकसान होत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावरुन दुर्लक्ष होत आहे. भविष्य निर्वाह निधिची रक्कम मागिल बरेच महीण्यापासुन संबधिताचे खात्यात जमा केलेली नाही. 

४) ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन वसुली नाही म्हणुन का थांबविण्यात आले. शासन निर्णय क्रमांक व्हिपीएन-२०१२/ प्रक्र २३५/ परा-३ दिनांक ४/३/२०१४ नुसार ग्रामपंचायतीची वसुलीची जबाबदारी ग्राम पंचायत कर्मचारी, ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी / सरपंच व पदाधिकारी यांची असतांना फक्त ग्रामपंचागत कर्मचाऱ्या बीच वेतन का थांबविल्या जाते ? ५) महाराष्ट्र शासनवित्त विभाग शासन निणर्य क्र. संकिर्ण २०१७ / प्रक्र६९: विमा प्रशासन दिनांक ११ ऑगष्ट २०१७ व शासन निर्णय क्रः क व्हिपीएम- २०१६/प्रक्र. १७६ परा-३ दिनोक ४/१/२०१८ नुसार ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचा अपघात विमा उतरविण्याचे शासक निर्णय आहेत, परंतु जिल्हयात एकाही ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे अपघात विमा उतरविलेला नाही. 

६) जिल्हा परिषद सेवेत ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची १०% पदभरती अनियमितता, शासन नियमानुसार नियुक्ती बाबत. ७) कोवीड-१९ संदर्भात कोरोनाची गंभिर परिस्थीती लक्षात घेऊन प्रशासना मार्फत ग्रामपंचायत स्तरावर कोरोना विषानुमुळे उदभलेल्या संसर्गजन्यरोगाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक कार्यवाही करणारे ग्रामपंचायत कर्मचारी कामगार यांना प्रोत्याहन भत्ता देण्याचे शासन निर्णय आहेत, त्याअनुषंगाने जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना फक्त
एकाच महीण्याचा प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायती कडुन अदा करण्यात आलेले आहे.

 वास्तविक पाहता उपरोक्त प्रोत्साहन भत्ता कोराना कालावधी संपेपावेतो १५ व्या वित्त आयोगातून अदा करण्याचे शासन निर्देश आहेत. ८) सेवापुस्तीका अद्यावत ठेवणे बाबत. तेव्हा कृपया विनंती आहे की, यथाशिघ्र थकीत असलेला वेतन, पंचायतीचा हिस्सा राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधिची रक्कम व्याजासह देण्यावाचत आदेश निर्गमित करण्यात यावे ही विनंती. ज्या ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, पंचायतीचा हिस्सा, राहणीमान भत्ता, कोवीड १९ कोरोना प्रोत्साहन भत्ता, भविष्य निर्वाह निधिची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पदाधिकारी, ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी, यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक व्हिपीएम-२०१९ / प्रक्र १३२/ परा-३ दिनांक १० एप्रिल २०१९ नुसार कार्यवाही करावी. 

अशामागण्या असून या मागण्या मान्य न झाल्यास 'नाईलाजास्तव दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांचे दालनासमोर राज्याध्यक्ष विलास कु मरवार, सरचिटणीस दयानंद येरंडे व नांदेडचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पठाण यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजीव वानखेडे, अरविंद घुगे, अनिल कोत्तावार, गणेश गायकवाड, मारोती इरावार, प्रेमानंद कानिंदे, साईनाथ हटकर, लक्ष्मण मडावी, पोसानी मंत्रीवार, रतन नोळे, मलन्ना खंदारे, बालाजी व्यवहारे यांचेसह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने