बांगलादेश मध्ये हिंदू वर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात किनवट तालुका बंदची हाक.सकल हिंदू समाजातर्फे

किनवट :- बांगलादेशात हिंदूंची कत्तल, महिलांवर अत्याचार, मंदिरे उध्वस्त केल्या जात आहेत. त्याच्या निषेधार्थ आणि हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी १७ ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाज किनवटद्वारा पुकारलेल्या तालुका बंदमध्ये सर्वांनी स्वयंस्फूर्थ सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन आंदोलकांनी देश अस्थीर करुन हिंदूंना वेठीस धरले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यागपत्र देऊन हिंदूस्तानात आश्रय घेतल्यामुळे बांग्लादेशात हिंदूंना लक्ष केले जात आहे. बांगलादेशात २७ ठिकाणी जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करण्यात आले. हिंदूंची हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमण, दुकाने लुटणे, मंदिरांची तोडफोड करणे, हिंदू महिलांवर बलात्कार करणे, तेथील हिंदू हा अल्पसंख्यांक असल्यामुळे दहशतीखाली असून असुरक्षीत आहे. बांगलादेशी सैन्याने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल तरी भारत सरकारने त्यांच्यावर विश्वासून न राहाता युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असे सकल हिंदू समाज किनवट तालुक्यात सारखनीच्या वतीने भारत सरकारला आवाहन करण्यासाठी आणि घडलेल्या घटनांचा तिव्र निषेध म्हणून १७ ऑगस्ट रोजी सारखणी बंदची हाक दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने