उपोषण करते दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मागण्या पूर्ण करा. ओबीसी बांधवांकडून ३० जुलै रोजी हिमायतनगर बंद ची हाक.



हिमायतनगर :- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून दिलेल्या जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे या मागणीसाठी उपोषणास बसलेले दत्तात्रय अनंतवार यांची मागणी मान्य करावी व उपोषण त्वरित सोडवावे. उपोषणकर्ते दत्तात्रय अनंतवार यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर ओबीसी बांधवांनी हिमायतनगर चे तहसीलदार यांना निवेदन देऊन दिनांक 30 जुलै रोजी हिमायतनगर बंदची हाक दिली आहे.

   याविषयी सविस्तर वृत्त असे की ओबीसी बांधवांना न्याय मागण्यासाठी ओबीसी कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार हे दिनांक २१ जुलैपासून अमर उपोषणास बसले आहेत. आज रोजी त्यांना उपोषणास बसून सात दिवस झालेले आहेत अजूनही शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत आहे. त्यामुळे हिमायतनगर येथील समस्त ओबीसी बांधव हे संतप्त झाले असून त्यांनी उपोषणकर्ते यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर चे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात हिमायतनगरच्या ओबीसी बांधवांनी उपोषणकर्ते दत्तात्रय आनंतवार यांच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दाखल घ्यावी व त्यांच्या मागण्या सोडवाव्या अन्यथा दिनांक ३० जुलै रोजी ओबीसी समाज हिमायतनगर च्या वतीने हिमायतनगर बंद ठेवण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असे नमूद केले आहे.

   यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना निवेदन देताना ओबीसी समाज संघटना तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, उपाध्यक्ष दिलीप राठोड,श्यामसुंदर ढगे संतोष सातव,राम पाकलवार, मारोती शिंदे, महादा आंबेडल्लू, पी के चव्हाण यांच्यासह आदिजन उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने